महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे गावात लोकांना ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी गावातील ग्राम पंचायतने ठराव मंजूर केला आहे. बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की, भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावात. जेणे करुन संविधान आणि लोकशाहीला चालना मिळेल.
ALSO READ: संजय राऊत काँग्रेसमध्ये जाणार ! दिल्लीत काँग्रेस हायकमांडसोबत सतत बैठका घेत आहेत, या मोठ्या नेत्याच्या दाव्याने उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली
आणि राज्यघटनेचे रक्षण आणि लोकशाही बळकट करण्याच्या उद्देश्याने हे पाउल घेतले आहे.
बहे गाव हे पश्चिम महाराष्ट्रातील दूसरे गांव आहे. ज्याने ईव्हीएम बदलून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
ALSO READ: मंत्रालयात प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली लागू, सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सरकारने घेतला निर्णय
या पूर्वी डिसेंबरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड(दक्षिण) विधानसभा मतदारसंघातील कोळेवाडी गावातील ग्रामसभेने असाच ठराव केला होता.
बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपर मधून घ्यावात. आम्ही इतर गावांना आणि त्यांच्या ग्रामपंचायतींना देखील असे ठराव संमत करण्याचे आवाहन करतो. जेणेकरून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण होउ शकेल.गावातील लोकांनी हा प्रस्ताव तहसीलदाराकडे सादर केला आहे.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.