महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.7 – छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही चुकीचे वक्तव्य केले आहे.महापुरुषांबद्दल सातत्याने चुकीची वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुरकर यांचा तीव्र निषेध करीत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

अभिनेते राहुल सोलापुकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल ऐतिहासिक आग्र्याच्या सुटकेबाबत वक्तव्य करताना अत्यंत अवमानकारक लाच शब्दाचा प्रयोग केल्याबद्दल राहुल सोलापुकरांचा आपण तीव्र धिक्कार करीत आहोत.या वक्तव्यानंतर राहुल सोलापुरकर यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असुन त्या व्हिडीओत राहुल सोलापुरकर हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करीत असल्याचे दिसुन येत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला.विषमतेचे प्रतीक असणाऱ्या ब्राम्हण्यवादाचा, चातुर्वर्णाचा विरोध केला आहे.त्या ब्राम्हण्यवादातुन डॉ बाबासाहेबांना ब्राम्हण ठरविण्याचा आटापिटा राहुल सोलापुरकरांनी आपल्या वक्तव्यातुन केला आहे.त्यामुळे महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुकर यांचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत, असे ना.रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Back To Top