काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ऐन निवडणुक प्रचारात महिलांसाठी अविश्वासार्ह योजना जाहीर करून आचारसंहितेचा भंग केला – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ऐन निवडणुक प्रचारात महिलांसाठी अविश्वासार्ह योजना जाहीर करून आचार संहितेचा भंग केला आहे – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ मे २०२४ : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांनी महिलांना एक लाख रुपये देऊन ‘महालक्ष्मी’ नावाची योजना सुरू करण्यात येईल असे जाहीर केले, त्यावर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावरती महिलांची दिशाभूल करणारी विधानं करण्यामध्ये मविआच्या नेत्यांची मोठी स्पर्धा चाललेली आहे.काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आत्ताच जाहीर केलेल आहे की, महिलांना एक लाख रुपये देऊन महालक्ष्मी नावाची योजना ते सुरू करणार आहेत.म्हणजेच निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान चालू असताना अशी गोष्ट करायची आणि काही राज्यांमध्ये काँग्रेसच सरकार असताना अशी गोष्ट करायची म्हणजे खरंतर आचारसंहितेचा भंग आहे.आतापर्यंत बचत गटांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळवून द्या ही वारंवार सांगून सुद्धा केंद्र सरकारने केलेलं नव्हतं, याउलट केंद्र सरकारचं नवीन आलेले महिला धोरण, स्त्री केंद्री बजेट (Gender responsive budget),महिलांना विधानसभा व लोकसभेत आरक्षण असे अनेक निर्णय मा. पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहेत.त्यामुळे सोनिया गांधी यांचे जे आश्वासन आहे ते म्हणजे महिलांची दिशाभूल करणार अशा प्रकारचे ते आश्वासन आहे.

त्याखेरीज रेवन्नाची केस असेल किंवा इतर केसेस असतील त्याच्यामध्ये केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी काँग्रेस या प्रकारचे उद्योग सातत्याने करतो, परंतु कल्पना गिरीची केस असेल किंवा तंदूर कांड असेल अशा अनेक बाबतीमध्ये काँग्रेसचे महिलांच्या संदर्भात विशेषतः असणारी प्रचंड वासनांध भूमिका आणि त्या पक्षामधले अनेक लोक हे सगळ्या समाजाचाच भाग असल्या सारखं आपल्याला दिसून येतं आहे. त्यामुळे सोनियाजी गांधी यांनी जी घोषणा केली आहे ती अजिबात विश्वासार्ह नाही असे मत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *