विकास बनसोडे या बौध्द युवकाच्या ऑनर किलिंगमुळे झालेल्या निघृण हत्येचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 – बीड जिल्ह्या तील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे याची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली.दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहाण करुन क्रूरपणे आकाश बनसोडे ची हत्या करण्यात आली.या निघृण हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडातील मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
मयत विकास बनसोडे हा मुळचा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तरीचा रहिवाशी आहे.प्रेम प्रकरणाच्या संशयातुन विकास बनसोडे ची झालेली हत्या ऑनरकिलिंग चा प्रकार आहे.काही दिवसां पूर्वी पुणे जिल्हयात भोर तालुक्यात ऊत्रोली गावातील विक्रम गायकवाड हा बौध्द युवक ऑनरकिलिंग चा बळी ठरला होता. जातीय वादातुन घडणाऱ्या या ऑनरकिलिंगच्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो.दलित बौध्द युवकांच्या ऑनर किलिंगमुळे झालेल्या या दोन्ही हत्या प्रकरणाचा सखोल तपास करुन सर्व आरोपींना अटक करावी आणि हा खुन खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अशा ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी यातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी आणि बळीतांना जलद गतीने न्याय देण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
विकास बनसोडे हत्या प्रकरणी 6 आरोपी अटकेत आहेत उर्वरित सर्व आरोपींना येत्या आठवड्यात अटक न केल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड मध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष आणि युवक आघाडी चे राज्य अध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.