मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

मंदिर सरकारीकरण,मंदिरांच्या भूमी बळकावणे,वक्फ बोर्डचे अतिक्रमण, वस्रसंहिता आदी विषयांवर होणार चर्चा

विरार/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०३/२०२५ – आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले.आज मात्र भारताने सेक्युलरवादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांचा भ्रष्टाचार, पैसे घेऊन व्ही.आय.पी. दर्शन,मंदिरांची भूमी बळकावणे,वक्फ बोर्डचे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण चालू आहे. अशा वेळी मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे हे हिंदु समाजाचे दायित्व आहे.एकूणच मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे,मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे,दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त,पुजारी,भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी श्री जीवदानी देवी संस्थान,महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मार्च २०२५ या दिवशी विष्णुप्रतिभा बैंक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.या अधिवेशनाला संपूर्ण पालघर जिल्ह्यातून २०० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी,पुरोहित, मंदिरां च्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संयोजक प्रदीप तेंडोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला वसई येथील श्री दिवाणेश्वर महादेव मंदिराचे प्रबंधक जगदीश शास्त्री,हिंदू जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, सनातन संस्थेच्या सौ.धनश्री केळशीकर हेही उपस्थित होते.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे मुंबई व पालघर जिल्हा समन्वयक बळवंत पाठक म्हणाले की,फेब्रुवारी २०२३ जळगाव येथे पहिल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली होती.त्यानंतर ओझर पुणे येथे दुसरी आणि शिर्डी येथे तिसरी परिषद झाली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून दोन वर्षांच्या आत ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे.महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे तर १५ हजारांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.

या अधिवेशनाला भगिरथी महाराज मानव सेवा संस्थानचे पू.काशीगिरी महाराज,मेढे (वसई) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमा चे संस्थापक पू.भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, बोरिवली येथील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष हभप अरुण महाराज कदम,सप्तशृंगी देवस्थानचे अध्यक्ष सुदर्शन दहातोंडे,डहाणू येथील श्री हनुमान मंदिराचे विश्वस्त अशोक राजपूत,उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता नीलेश पावसकर,मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या स्वाती दीक्षित,मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र- छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट,हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ.उदय धुरी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. वसई येथील श्री दिवाणेश्वर महादेव मंदिर प्रबंधक जगदीश शास्त्री आणि सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी मंदिरांचे संघटनाची आवश्यकता नमूद करून या अधिवेशनाचे महत्व स्पष्ट केले.

या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.यामध्ये मंदिरे सनातन धर्म प्रचार केंद्रे बनवणे,मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे,वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय,मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णाेद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 9273181385/ 9702698282 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाचे वतीने विजय जोशी,विश्वस्त श्री जीवदानी देवी संस्थान ,संयोजक महाराष्ट्र मंदिर महासंघ जि.पालघर आणि विलास निकम संघटक,महाराष्ट्र मंदिर महासंघ, जि. पालघर यांनी केले आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading