आज शेतकरी संवेदना दिवस (आत्महत्या दिवस,अन्नत्याग दिवस)
सांगली/ ज्ञानप्रवाह न्यूज – १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रा तील यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावातील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी त्यांच्या पत्नी मालती आणि चार मुलांसह आत्महत्या केली. ही घटना राज्यातील पहिली नोंदवलेली शेतकरी आत्महत्या मानली जाते.करपे कुटुंबाने थकीत वीज बिलामुळे वीज जोडणी खंडित केल्याने आणि त्यामुळे पिके वाळल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या संकटामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
या दुर्दैवी घटनेच्या स्मृतीसाठी १९ मार्च हा दिवस शेतकरी सहवेदना दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी विविध संघटना आणि शेतकरीपुत्र अन्नत्याग आंदोलन, उपवास, पदयात्रा आणि मेळावे आयोजित करून शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबावे आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी करतात.
आजही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही यावरती ठोस उपाय होणे गरजेचे आहे.या आत्महत्या होण्याचे कारण म्हणजे केवळ आणि केवळ सरकारची धोरणे जबाबदार आहेत मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो.सरकार शेतकऱ्यांचा कळवळा असलेले दाखवतं व तकलादू उपाययोजना करत त्यातही त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशी (उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव ) तसेच इतर तज्ञांनी सुचवलेले उपायांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. समस्येवर ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे. आजचा एक दिवस अन्नत्याग आज पर्यंत देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी मी करतोय आपणही करणार का ? – संदीप राजोबा
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.