इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या गोडावून येथील परिसरात मोबाईल जॅमर बसविणे तसेच मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावेत – शहर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM मशीन) ठेवलेल्या रामवाडी गोडावून सोलापूर येथील स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोबाईल जॅमर बसविणे तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावेत – सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ मे २०२४ – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM मशीन) ठेवलेल्या रामवाडी गोडावून सोलापूर येथील स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोबाईल जॅमर बसविणे तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिष्टंडळाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,सोलापूर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, मा.परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, नासीर बंगाली आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, ४२- सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस,महाविकास विकास,INDIA आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ. प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढविली होती.दि.०७ मे २०२४ रोजी मतदान झाले असून दि.०४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर, किंवा वायफाय इत्यादीच्या माध्यमातून छेडछाड (हँकिंग) करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रीयेत निष्पक्षता रहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडावून सोलापूर येथील निवडणूकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशा मागणीचे निवेदन देऊन ताबडतोब सुरक्षेचा उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *