अभिनेत्री कंगणा राणावत मंडी लोकसभा क्षेत्राचा आवाज संसदेत बुलंद करतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जो चाहिए वो मांगना,क्योंकी चुनकर आएगी कंगणा
रामदास आठवलेंच्या कवितांनी मंडी मध्ये कंगणा राणावतच्या प्रचारात आणली रंगत

मंडी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.28- बॉलिवुडची लोकप्रिय अभिनेत्री कंगणा राणावत ही अभिनयकलेने देशभरात लोकप्रिय आहे.अभिनयासोबत तिला समाजसेवेची मनस्वी आवड आहे.राजकारणाची समाज कारणाची आवड आणि अभ्यास आहे. कंगणा राणावतला गरिबांच्या प्रश्नांची जाणीव आहे.हिमाचल ची कन्या म्हणून अभिनेत्री कंगणा रणावत मंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेचा संसदेत आवाज बुलंद करतील.त्यामुळे मंडीतील जनतेने बहुगुणी अभिनेत्री कंगणा राणावत ला बहुमताने खासदार म्हणुन निवडून द्यावे.असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मंडी येथील गोमटा गोपालपुर येथे आयोजित जाहिर प्रचार सभेत केले.यावेळी मंचावर मंडी लोकसभा क्षेत्राच्या भाजपच्या उमेदवार कंगणा राणावत आणि भाजप रिपाइं चे अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे 2 दिवसीय हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी हमिरपुर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि मंडी लोकसभा मतदार संघाच्या भाजप च्या उमेदवार कंगणा राणावत यांचा प्रचार केला.या दौऱ्यात आज त्यांनी जाहिर प्रचार सभांना संबोधित केले,पदयात्रा केल्या. मंडी मधील जाहुर या गावात अभिनेत्री कंगणा राणावत चे वडील अमरदिप राणावत यांनी ना.रामदास आठवले यांचे स्वागत केले.

जो चाहिए वो मांगना,
क्योंकी चुनकर आएगी कंगणा
अशी कविता सादर करुन ना.रामदास आठवले यांनी केलेल्या भाषणाला येथील जनतेने उदंड प्रतिसाद दिला.

ज्यांच्यावर कसलाही नाही डाग ते निवडुण येणार आहेत ठाकुर अनुराग असे काव्यमय आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.मंडी आणि हमिरपुर मधील जनतेने ना.रामदास आठवले यांचे काव्यमय शैलीतील भाषण ऐकण्यास मोठी गर्दी केली होती.कंगणा राणावत यांच्या प्रचारात ना.रामदास आठवले यांच्या चारोळी कवितांनी रंगत आणली.

काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळात देशाचा विकास खुंटवला.गरिबी हटावचा नारा देऊन गरिबी हटवली नाही.मात्र काँग्रेसने गरिबांना हटवण्याचे काम केले.त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविले पाहिजे.नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी अनुराग ठाकुर आणि कंगणा राणावत यांना निवडुन देण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *