पंढरपूर अंधशाळेत महात्मा फुले जयंती साजरी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०४/२०२५- पंढरपूर लायन्स क्लब संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यश बावधनकर,अथर्व जकाते हे होते.प्रथम मुलांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीताने केले.नंतर पाहुण्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

प्रतिमेच्या पूजनानंतर कु.आरोही वाघमारे ने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्याविषयी भाषण केले.मुख्याध्यापक श्री बाराहाते सरांनी प्रास्तविक केले.यश बावधकरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका सौ. रोहिणी घोडके यांनी केले.आभार नितीन कटप सरांनी मानले.या कार्यक्रमाला अध्यक्ष व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

