सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे महत्त्वपूर्ण पाऊल – ॲड. चैतन्य भंडारी

सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ एक परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते – ॲड.चैतन्य भंडारी

धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज :- धुळे येथे पार पडलेली सायबर कॉन्क्लेव 1.0 – मिशन सायबर सेफ खान्देश ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ही परिषद सायबर कायदा आणि सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्याच्या उ‌द्देशाने सायबर अवेअरनेस फाऊंडेशन आणि सायबर क्लोक डिजिटल लिगल सर्व्हिसेस चे संस्थापक ॲड. चैतन्य भंडारी यांनी आयोजित केली होती.

या परिषदेचे प्रमुख पाहूणे म्हणून मा. न्यायमूर्ती सारंग कोतवाल,पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे ,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे ,ॲड. डी.वाय.तवर उपस्थित होते.

या परिषदेतील प्रमुख वक्ते म्हणून ॲड.डॉ. प्रशांत माळी सायबर तज्ञ मुंबई आणि डॉ. रक्षित टंडन आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ञ यांनी सायबर जागरूकता संदर्भात महत्वाचे विचार मांडले आणि त्यांनी सायबर गुन्ह्यां पासून बचाव कसा करायचा हे देखील सांगितले आणि म्हणाले की, चैतन्य भंडारी यांनी सायबर क्षेत्रात चांगले काम केले आहे.

यावेळी झालेल्या पॅनेल चर्चेमध्ये पोलीस, सरकारी वकील, सायबर एक्सपर्ट व युवा वकिलांनी सहभाग घेतला.ॲड.चैतन्य भंडारी यांनी डिजिटल हिरो अवॉर्ड देऊन सायबर क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला. ही परिषद ॲड. चैतन्य मोहन भंडारी व त्यांच्या समर्पित टीम मधील ॲड.प्रशांत वाघ,ॲड प्राजक्ता राणा, साक्षी पारशकर,ॲड समीर शाह,कामिनी देसले, भक्ती शहा,पुष्पेश श्रीखंडे आणि हसमीत ग्यानी यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाली.

Leave a Reply

Back To Top