PBKS vs KKR: आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या


KKR vs PBKS

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 चा 31 वा सामना मंगळवार 15 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांसमोर येतील. 

ALSO READ: आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची पुन्हा निवड

पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मंगळवार 15 एप्रिल रोजी महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे. नाणेफेक 7 वाजता होईल.

ALSO READ: एकदिवसीय सामन्यात दोन चेंडू वापरण्याच्या नियमात आयसीसी बदल करू शकते

पंजाब किंग्ज आतापर्यंत पाचपैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर केकेआर सहापैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

या हंगामात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये (IPL 2025 पॉइंट्स टेबल), कोलकाता पाचव्या आणि पंजाब सहाव्या स्थानावर आहे. पंजाब आपला सहावा सामना खेळेल, तर कोलकाता आपला सातवा सामना खेळेल.

ALSO READ: हार्दिकने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम रचला

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर प्रियांस आर्य आणि प्रभसिमरन उत्तम फॉर्ममध्ये आहेत. हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात श्रेयसने 36 चेंडूत82 धावा केल्या होत्या. तर, प्रियांश ने 26 आणि प्रभसिमरनने 42 धावा केल्या. हैदराबादविरुद्धही मॅक्सवेल काहीही करू शकला नाही. त्याने फक्त 7 चेंडूत3 धावा केल्या. संघाने एसआरएच (सनरायझर्स हैदराबाद) ला 245 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु अभिषेक शर्माच्या 55 ​​चेंडूत 141 धावांच्या स्फोटक खेळीमुळे श्रेयसच्या चेहऱ्यावर निराशा आली. आता पंजाबला मंगळवारी होणारा सामना जिंकायचा असेल. 

 

कोलकाता आणि पंजाबबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ 33 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाताने 21 वेळा पंजाबला हरवले आहे. त्याच वेळी, पंजाबने फक्त 12 वेळा विजय मिळवला आहे. 

 

दोन्ही संघाचे प्लेइंग 11 जाणून घ्या 

 

पंजाब किंग्ज संभाव्य इलेव्हन (पीबीकेएस प्लेइंग 11)

प्रियांश आर्य, प्रभसमिरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल

 

कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन (केकेआर प्लेइंग 11)

अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा.

Edited By – Priya Dixit 

 



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading