मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष तथा तिरुपती देवस्थानचे सदस्य अमोल काळे यांचे दुःखद निधन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचे अमेरिकेत दुःखद निधन

मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष तथा तिरुपती देवस्थानचे सदस्य तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचे अमेरिकेत दुःखद निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आज एमसीए मध्ये ठेवण्यात आले होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आ.आशिष शेलार, तिरुपती देवस्थान समिती सदस्य मिलिंद नार्वेकर, सनदी अधिकारी भूषण गगराणी, प्रविण दराडे, महेंद्र कल्याणकर, विवेक फणसाळकर, देवेन भारती आदी मंत्री, आमदार, आयपीएस व आयएएस अधिकारी, कार्यकर्ते काळे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top