समस्या सोडविण्यासाठी आ.समाधान आवताडे मैदानात पंढरपूर शहरातील अडचणींबाबत नगरपालिकेला दिल्या सूचना

समस्या सोडविण्यासाठी आ.समाधान आवताडे मैदानात पंढरपूर शहरातील अडचणींबाबत नगरपालिकेला दिल्या सूचना

कुंभार गल्ली शिंदे नाईक नगर भागातील गंभीर विषय सोडविण्यासाठी घेतले मनावर

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४- पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवीत नाही.त्यामुळे याबाबतचा रोष केवळ लोकप्रतिनिधी म्हणून आ.समाधान आवताडे यांच्यावर येत आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत यापुढील काळात स्वतः आ.समाधान आवताडे यांनी लक्ष घातले असून नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

पंढरपूर शहरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.यामुळे अनेक भागातील रस्ते वाहून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.काही भागातील सिमेंटचे रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत.याबाबत बुधवारी आमदार समाधान आवताडे यांनी ठिकठिकाणी भेटी देवून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहे. येथील कुंभार गल्लीपासून शिंदे नाईक नगर भागातील रस्त्यावर पाणी आणि काटेरी झुडपे वाढलेली आहेत.पाण्याचा निचरा झाला नाही व तसेच साचून राहिले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.रेल्वे लाईनच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही.तसेच येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्त्याची दुरवस्था असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून त्या ठिकाणची परिस्थिती आमदार समाधान आवताडे यांनी कळविली आहे.त्या ठिकाणी त्वरित पाणी कशा पद्धतीने उपसा होईल याची दक्षता घेऊन लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती मुरूम भरून घेण्यात यावा असा आदेश दिला.यावेळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे नेताजी पवार हे उपस्थित होते.

सरगम चौक व इंदिरा गांधी यामधील रेल्वे पूल याची पाहणी करून रेल्वेचे अधिकारी बोलवून तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांनाही सूचना देऊन पाण्याचा निचरा करण्यात यावा व वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा असे आदेशही दिले आहेत. यामुळे आ. समाधान आवताडे आता शहरातील समस्या सोडविण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसून आले आहेत.

पंढरपूर नगरपालिकेला आ.समाधान आवताडे यांनी सूचना देण्याचे कर्तव्य बजावले असले तरी या शिंदे नाईक नगर भागातील गंभीर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कधी मुहूर्त लागणार यावरच ठिकठिकाणी दिलेल्या भेटीचे सार्थकी ठरणार आहे हे मात्र नक्की.

पाणी साठलेल्या ठिकाणी केवळ मुरुम टाकून उपयोग नाही कारण मुरुमामुळे चिखल होऊन रस्ता निसरडा होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading