वाखरी येथे संचारबंदी आदेश लागू असताना वाढदिवस साजरा केला म्हणून गुन्हा दाखल
वाखरी येथे संचारबंदी आदेश लागू असताना वाढदिवस साजरा केला म्हणून गुन्हा दाखल Filed a crime as birthday was celebrated while the curfew order was in force at Wakhri
पंढरपूर /नागेश आदापूरे – पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वाखरी ता.पंढरपूर येथील वाखरी गावचे ग्रामपंचायत शिपाई जितेंद्र उर्फ नाना दिंगबर पोरे यांचा वाढदिवस असल्याने गावातील उपसरपंच संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड वाखरी,संजय विठ्ठल लेंगरे वाखरी ग्रामपंचायत सदस्य ,योगेश भारत पांढरे,शंकर महादेव सलगर, विठ्ठल परमेश्वर लोखंड ,सुधाकर मधुकर शिंदे ,रोहित पांडुरंग गायकवाड़ ,विश्वास लक्ष्मण कोळी, शिवाजी रंगनाथ हाके ,किरण सुखदेव कांबळे, जितेंद्र उर्फ नाना दिंगबर पोरे सर्व रा.वाखरी ता.पंढरपूर हे सर्वजण मिळून मोटार सायकल नं.एम.एच 13 बी पी 5156 यासह श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ वाखरी ता.पंढरपुर येथील चौथाऱ्यावर येवून जिल्हाधिकारी सोलापूर,यांचेकडील आदेशा अन्वये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेश लागू केली असताना तसेच जिल्हयात,महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण भारतात कोरोना व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव असून त्यावर विविध प्रकारच्या उपाय योजना महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन करीत असताना मौजे वाखरी ता.पंढरपूर येथील पालखी तळावरील श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या चौथऱ्यावर दि.18/06/ 2021 रोजी रात्रौ 07/30 वा.चे सुमारास वर नमुद इसमांनी एकत्र जमून वरील मोटार सायकल ही चौथऱ्यावर नेवून तिचेवर वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करुन वरील आदेशाचा अंमल चालु असताना भंग केला आहे .
त्याबाबत बाळू गौतम शेंडे,गावकामगार पोलीस पाटील वाखरी यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेस फिर्याद दिल्याने वरील लोकांविरुध्द पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं .250 / 2021 भादविक 295,188,269,34 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 साथीचे रोग अधिनियम सन 1897 चे कलम 2,3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पंढरपुर व पो.नि.प्रशांत भस्मे पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार टी.ए.मुंडे पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत .