सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत
वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने उद्या सर्व पर्यटकांना गंगटोकमध्ये आणणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मदतकार्याला वेग
मुंबई :- सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेला मुसळधार पडून रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले आहेत. यात महाराष्ट्र राज्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.ही बातमी समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले.त्यामुळे आता उद्या या सर्व पर्यटकांना वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने गंगटोक येथे सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे.

सिक्कीम येथे झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे तेथील स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.ही बातमी मुख्यमंत्र्यांना माध्यमांद्वारे समजली. त्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून अडकलेल्या सर्व पर्यटकांना राज्य शासना मार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले.एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः सिक्कीम सरकार मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून राज्यातील पर्यटकांना मदत मिळवून देण्याची विनंती केली.तसेच तिथे अडकलेल्या पर्यटक सुनीता पवार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांना लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला.

सिक्कीममधून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व पर्यटक हे सध्या सुरक्षित असून त्यांच्यापर्यंत सर्व मदत पोहचवण्यात येत आहे तसेच त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले असून उद्या वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना गंगटोक येथे सुरक्षितस्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मदतकार्यावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असून राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी देखील या पर्यटकांशी सतत संपर्कात आहेत. त्यांच्याशिवाय अजून कुणीही सिक्कीममध्ये अडकले असल्यास त्यांनी त्वरित राज्य शासनाला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.