केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे झाले भव्य स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅटट्रिक केल्यानंतर मुंबई रामदास आठवले यांचे झाले भव्य स्वागत


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


चैत्यभूमी येथे फादर्स डे चे औचित्य साधत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले अभिवादन

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्री पद भूषवत आहेत.

तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ना.रामदास आठवले यांचे आज प्रथमच दिल्लीतून मुंबईत आगमन झाले.त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय राज्यमंत्रीपदाची हॅटट्रिक करणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागत सत्कारासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी केली होती.मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथे ना.रामदास आठवले यांची रिपाइं कार्यकर्त्यांनी भव्य रथातून मिरवणूक काढून वाजत गाजत आनंदोत्सव साजरा केला.

त्यानंतर ना.रामदास आठवले थेट चैत्यभूमी येथे रवाना झाले.चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ना.रामदास आठवले यांनी अभिवादन केले.आज फादर्स डे चा ही योग जुळून आला होता. कार्यकर्त्यापासून मंत्रीपदापर्यंत जे आहे ते सर्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरां मुळे आम्हाला लाभले असल्याची कृतज्ञ भावना ना.रामदास आठवलेंनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

यावेळी ना.रामदास आठवलेंवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जेसीबी तून पुष्पवर्षाव केला. मोठ्या प्रमाणात ना.रामदास आठवलें यांचे पुष्पहार पुष्पगुच्छ मिठाई देऊन अभिनंदन करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.त्यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत.यूपीए च्या काळात जे आघाडी सरकार होते त्यास भाजप ने कधीही अल्पमतातील सरकार असा आरोप केला नव्हता.मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे.गरीब झोपडीवासी दलित बहुजन सर्व वर्गाची मी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सेवा करीन माझी जबाबदारी योग्य रितीने पार पाडीन असे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

यावेळी सौ सीमाताई आठवले, कुमार जित आठवले,रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे,मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरूड, सरचिटणीस विवेक पवार,जिल्हाध्यक्ष साधू कटके, रमेश गायकवाड,संजय डोळसे,प्रकाश जाधव; संजय पवार, अजित रणदिवे ;सुरेश बार्शिंग ; दयाळ बहादुर; श्रीकांत भालेराव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे,मंगल माळगे, सोलापूरचे जितेंद्र बनसोडे,प्रल्हाद जाधव, भास्कर वाघमारे, अभयाताई सोनवणे, उषाताई रामलु, मीनाताई वैराट,सोना कांबळे,अमित तांबे,सुमित वजाळे,रवी गायकवाड,सचीन मोहिते,घनश्याम चिरणकर,कामु पवार,युवराज सावंत,अरुण पाठारे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते .


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading