Fate Scam: ‘फटे स्कॅम’ची व्याप्ती मोठी; डॉक्टर, पोलीस, पत्रकारांसह भले भले फसले! दोन आरोपी अटकेत
हायलाइट्स:
- शेअर मार्केटच्या नावाखाली घातला कोट्यवधींचा गंडा
- बार्शीच्या फटे कुटुंबातील दोघे अटकेत
- मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार
बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा आता पाऊस पडत आहे. गुन्हा दाखल होत असताना केवळ ५ लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र, शुक्रवारी अन् शनिवारी या दोन दिवसांत आणखी ४० लोकांनी आपली फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली असून पुढील तपास सुरू केला आहे. त्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून विशालचा शोध घेण्यात येत आहे.
वाचा: खासगी रुग्णालयांना तंबी; संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार कराल तर…
दरम्यान, विशालने बार्शीसह देशभरातील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यात उच्च शिक्षित नोकरदार, डॉक्टर, व्यापारी, पोलीस अधिकारी, पत्रकार आणि हिंदी चॅनेलच्या न्यूज अँकर्सचाही समावेश आहे. मात्र, अधिकृतपणे कुणीही तक्रार द्यायला तयार नाही किंवा बोलायला तयार नाहीत. त्यामुळे अल्गोरिदमच्या नावाखाली फैलावलेल्या या आर्थिक जाळ्यात कोण, कोण अडकले आहे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. विशाल फटेच्या अटकेनंतरच सर्व पत्ते उघड होणार आहेत.
वाचा: किरण माने प्रकरणावर गृह राज्यमंत्र्यांची परखड भूमिका; म्हणाले…