श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; बापाचे हात बळकट करण्यासाठी लेक सरसावली!


औरंगाबाद : प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. कमवता मुलगा हा घरचा आर्थिक भार उचलतोच. पण एखाद्या कुटुंबाचा भार मुलीने उचललाय असं किंचितच पाहायला मिळते. असच काही औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील खादगाव येथे पाहायला मिळालं. कारण गिरी कुटुंबातील घराची जबाबदारी शाळकरी मुलगी उचलते. एकट्या कुटुंबाचा गाडा ओढताना बापाची होणारी दमछाक लेकीला कळाली आणि बापाचे हात अधिक बळकट करण्यासाठी लेकीने पुढाकार घेत वडिलांच्या हाताला कष्टाचे बळ देण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे.

नववीतच्या वर्गात शिकणारी पल्लवी आपले वडील रामनाथ गिरी यांना मदतीचा हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेल, विहीर यामधील नादुरूस्ती विद्युत मोटार भरण्यासाठी धडपड करते. पल्लवी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शाळेत जाते आणि पाचनंतर बाबांना मदतीचा हातभार लावण्याचे काम करते. वडील हे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटर भरण्याचे काम करतात. मात्र तीन मुली यातील एक मुलगी मुलींचे लग्न करायचं त्यासाठी कुटुंबावर मोठा आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. घरातील आर्थिक परिस्थिती पल्लवीला स्वस्थ बसू देत नसल्याने आपल्या वडिलांना आपणही मदतीचा हातभार लावला पाहिजे असे पल्लवीला वाटते.

पावसाळा असो किंवा हिवाळा नाही तर उन्हाळा या तिन्ही ऋतुमध्ये शेतातील विद्युप मोटारची गरज पडत असते. थोडीफार विद्युत मध्येखराब झाल्यास या विद्युत मोटर खराब होत असतात तीच मोटार दुरूस्त करण्याचे कौशल्य तिने अवगत केले आहे. त्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या पार्टची ओळख झाली आहे. यातुन दिवसाला चांगली कमाई होते आणि थकलेल्या वडिलांना मदतही. सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत पल्लवी वडिलांच्या कामात हातभार लावत असते.

मुलीच्या शिक्षण दुर्लक्षाचा वडिलांना खेद

यामध्ये तिचे शिक्षणावर दुर्लक्ष होत असल्याबद्दल तिला आणि वडीलांना देखिल खेद वाटतो, परंतु कुटुंबाच्या जगण्यासाठी काम करणे यात काहीच वाईट नाही. भावनांना व्यक्त करताना हे दिवस असेच राहणार नाहीत, आयुष्यात आज ना उद्या बदल होईल आणि चांगले दिवस येतील असा पल्लवीला आशावाद आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: