Pune: भर रस्त्यात मुलीचा हात पकडून म्हणाला, मैं तुमसे…


हायलाइट्स:

  • पुण्यात भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
  • २२ वर्षीय तरुणाला अटक, विनयभंगाचा गुन्हा दाखल
  • आरोपी तरुणाला मारहाण करणाऱ्यांवरही गुन्हा

पुणे: भर रस्त्यात १४ वर्षांच्या मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करणाऱ्या २२ वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला मारहाण करणाऱ्या पीडित मुलीच्या भावांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम कैलास दारवटकर (वय २२, शुक्रवार पेठ) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी कस्तुरी चौक परिसरातून जात असताना आरोपी तरुण तिचा पाठलाग करत आला. तिचा हात पकडून ‘मैं तुमसे फ्रेंडशिप करना चाहता हूं… तुम भी मुझसे फ्रेंडशिप करो’ असं तिला म्हणाला. घाबरलेल्या मुलीनं झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या भावांना दिली. हे कळताच त्यांनी शुभमला शोधत शोधत अखेर गुरुवार पेठेत गाठले आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

वाचा: ‘यूपीतील ‘हा’ अंडरकरंट भाजपच्या हेकेखोरीला चिरडून टाकेल’

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. शुभम पूर्वी देखील या मुलीचा पाठलाग करत असे व तिच्याकडे एकटक नजरेने बघत असे. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तर, त्यानं दिलेल्या तक्रारीनंतर मुलीच्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा: प्रा. एन डी पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचारास प्रतिसाद मिळेना!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: