आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला आठ ते दहा जागा व एक मंत्रीपद द्यावे- रामदास आठवले यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कडून रिपब्लिकन पक्षाला आठ ते दहा जागा व एक मंत्रीपद द्यावे- रामदास आठवले यांची मागणी


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ –आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि महायुतीमधून आठ ते दहा विधानसभेच्या जागा सोडण्यात याव्यात, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद व एक विधान परिषद देण्यात येऊन सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

अंधेरी येथे पत्रकार वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्यावेळी रामदास आठवले यांनी विविध प्रश्नंवर आढावा घेताना रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज्यात काँग्रेस आणि विरोधी पक्षाने संविधान बदलाची भीती दाखवून दलित समाजाची मते वळवण्यात यश मिळवले असले तरी ही सर्व मते भाजपकडे आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, त्यासाठी दिल्लीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपली भेट झाली त्यामध्ये चर्चाही झाल्याचे आठवले यांनी सांगितले. संविधान जनजागृती यात्रा संपूर्ण देशभर राबवून जनजागृती केल्यानेच मागच्या वेळी एनडीए आणि भाजपाला यश मिळाले ,याची आठवण आठवले यांनी करून दिली. रिपब्लिकन पक्षांमध्ये दलितच नव्हे तर अन्य आघाडी मार्फत समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाने कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे. कार्यकर्त्यांचा मोठी फळी असणारा आपला रिपब्लिकन पक्ष आहे. रिपब्लिकन ऐक्यमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व केल्यास त्याचे आपण स्वागत करू, रिपब्लिकन नेत्याचे ऐक्य होत नसेल तर आंबेडकरी जनतेने एकेक करून आपली मतदानातून ताकद दाखवली पाहिजे, असंही आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, सुरेश बारशिंगे, अभिनेते अली खान ,श्रीकांत भालेराव, चंद्रशेखर कांबळे किशोर मासूम आदी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्र सरकार पुन्हा सरकार आले आणि सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक केंद्रीय मंत्री म्हणून पुन्हा नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

महायुतीचं म्हणजे एनडीए ची महाराष्ट्रातील पीछेहाट याचही त्यांनी विश्लेषण केल ते म्हणाले NDA आणि INDIA यांच्या दोन्हींच्या मतांमध्ये जास्त फरक नाही एनडीए ची मतं कमी झाली नाहीत असं त्यांनी मत मांडले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला आठ ते नऊ जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत घटना बदल होईल ही चुकीची माहिती विरोधकांनी नागरिकांना दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला तो मुद्दा आता चालणार नाही असं ते म्हणाले.

एकूणच त्यांनी लोकसभा निवडणूक आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक या विषयावर सविस्तर चर्च्या करून आपल्या पक्षाची अपेक्षा वाटचाल या बाबत भाष्य केले.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबाबत भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले माझं पहिल्यापासून मत आहे मराठा समाजाला ओबीसीत वेगळ आरक्षण द्यावे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केल्यास मीही आमच्या विभागामार्फत तसा ठराव तज्ञामार्फत घेईन असेही ते म्हणाले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading