मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 4 जुलैला मराठा क्रांति आक्रोश मोर्चा

मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा,अन्यथा 4 जुलैला मराठा क्रांति आक्रोश मोर्चा Accept the demands of the Maratha brothers, otherwise Maratha Kranti Akrosh Morcha on 4th July

पंढरपूर – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीमध्ये असलेले एसइबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक मराठा तरुण बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने मराठा बांधवांच्या काही मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा 4 जुलै रोजी सोलापूर येथे कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आ.नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.यापूर्वीच शासनाने या मागण्या मान्य कराव्यात याबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने पंढरपूर तहसील कार्यालयास देण्यात आले आहे .

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही प्रमुख मागणी आहे ,कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद तत्काळ करावी , मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेला तत्काळ एक हजार कोटी रुपये देऊन त्याचे उपकेंद्र सोलापुरात सुरू करावे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधून ते कोणत्याही संस्थेला न देता शासनाच्या नियंत्रणा खाली चालवावे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती चालू करण्यात यावी , मराठा आरक्षणा साठी ज्या मुलांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबा तील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये मदत निधी द्यावा अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

 या निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,संतोष कवडे,अ.भा.छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर जगताप, दिलीप साबळे, संजय पवार, मराठा महासंघाचे सोलापूरचे सचिव गुरुदास गुटाळ, अ.भा. छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण,विनोद लटके,सोमनाथ झेंड, पांडुरंग शिंदे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अमोल पवार, शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, बाळासाहेब कोले, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर शेळके, छावा क्रांतीवीर सेनेचे धनाजी लटके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिन गंगथडे, शिवक्रांती युवा संघटनेचे दत्तात्रय काळे, किरण भोसले, संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, संभाजी ब्रिगेड पुणे विभागचे किरण घाडगे,आनंद जाधव, महेश वडणे,मराठा क्रांती मोर्चाचे रामभाऊ गायकवाड, अखिल भारतीय मराठा महासंघ रिक्षा संघटनचे नागेश गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: