मग सामान्य जनतेनी #जगावे की मरावे या ट्रेंडखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

मग सामान्य जनतेनी #जगावे की मरावे या ट्रेंडखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
 पंढरपूर - केंद्र सरकार वारंवार डिझेल ,पेट्रोल, गॅस दरवाढी करत आहे.त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस rastrawadi congress प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील Jayant patil यांच्या आदेशाने 2 जुलै रोजी, मग सामान्य जनतेनी  #जगावे_की_मरावे या ट्रेडखाली महाराष्ट्रात प्रत्येक तालुका, शहर या ठिकाणी आंदोलन करण्यात आली.

 त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार दिपक साळूंखे पाटील,सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर मंगळवेढा तालूक व विधानसभा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस,राष्ट्रवादी महिला ओबीसी सेल यांच्यावतीने मरावे की जगावे हे आंदोलन करण्यात आले. टांग्यातून केंद्र सरकारच्या विरोधात स्टेशनरोड परिसरातून फेरी मारून निषेधाच्या घोषणाबाजी करण्यात आली.

  यावेळी पेट्रोल व डिझेल,गॅस यांना दुधाचा अभिषेक करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी जेष्ठनेते सुभाष भोसले, सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे,कोळी समाजाचे नेते अरुण कोळी, समता परिषदचे अनिल अभंगराव ,पंढरपूर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे ,पंढरपूर नगरपालिका चे नगरसेवक प्रशांत शिंदे,किरणराज घाडगे,प्रशांत मलपे,दिगम्बर सुडके,नागेश फाटे,आप्पा राऊत, सुहास म्हमाने,सुरज पावले,रशीद शेख,फारूक बागवान,अनंता नाईकनवरे,साधनाताई राऊत, रंजनताई हजारे,चारुशीला कुलकर्णी,कीर्ती मोरे, राधा मलपे,अमृता शेळके,पूजा कोळी, गायकवाड आत्या,अविंदता बनसोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: