पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध

पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध Pandharpur city Bharatiya Janata Party protests against Mahavikas Aghadi government
   पंढरपूर - महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक समाजघटकाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक उघड पाडली जाईल या भितीतूनच खोटे आरोप रचून भाजपचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ही लोकशाहीची गळचेपी असून या निलंबनाचा आम्ही निषेध करतो.जनतेच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करतच राहू कारण ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नावर ठाकरे सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लावून सरकारने भाजपाचे १२ आमदार निलंबित केल्यामुळे ठाकरे सरकारचा तीव्र निषेध पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक आणि विधानसभा आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक,पंढरपूर येथे करण्यात आला.

या भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबन निषेधार्थ भाजप शहर व ग्रामीण च्यावतीने युवक नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

    यावेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.भाजप शहराध्यक्ष विक्रम शिरसाट,भाजप ज्येष्ठ सदस्य शिरीष कटेकर, सुभाष मस्के सर, बादलसिंह ठाकूर, प्राजक्ताताई बेणारे, अपर्णाताई तारके यांच्यासह शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून आलेले सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: