पालखी सोहळ्यात भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार

पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे -विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली पालखी मार्ग,तळांची पाहणी

पंढरपूर, दि.05:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी,आरोग्य,सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

यावेळी आमदार रमेश बोरनारे,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह,नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुध्द जेवळीकर,सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता संजय माळी,प्रांताधिकारी सचिन इथापे,अमित माळी,मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे,पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, अक्षय महाराज भोसले,राणा महाराज वासकर,रामकृष्ण वीर महाराज तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा ,आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. भंडीशेगांव पालखी तळावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच त्या ठिकाणी आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवावी. पालखी तळांवर कायमस्वरुपी सुविधा देण्याबाबत पालखीसोहळा प्रमुखांशी चर्चा करुन नियोजन करावे. वारी कालावधीत वैद्यकीय सुविधेबरोबर तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी.श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा स्वागत विसावा मंदिर येथे श्री नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याकडून करण्यात येते. या ठिकाणी स्वागतासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. 65 एकर येथे प्रशासनाकडून दिड्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येते.ती जागा अपुरी पडत असेल तर खाजगी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

तसेच पालखी सोहळा आणि सर्व भाविकांचा प्रवास सुखकर,सुरक्षित होईल यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, कुठेही काही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यंदाची आषाढी यात्रा निर्मल वारी व्हावी यासाठी सर्व व्यवस्था चोख असेल याअनुषंगाने काम सुरु असल्याचे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, पालखी मार्ग व तळांवर सुविधा बाबत पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देवून ती कामे पुर्ण करण्यात येत आहेत. पालखी सोहळे जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सर्व भाविकांना , पालखी मार्ग व तळांवर आवश्यक सुविधा प्रशासनकडून उपलब्ध केल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर व तळांवर देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पालखी मार्ग व तळांवर जिल्हापरिषदे मार्फत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्नानगृह, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगांव, वाखरी येथील पालखी तळांची तसेच पत्राशेड, दर्शनरांग, चंद्रभागा नदी पात्र या ठिकाणची पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा स्वागत विसावा मंदिर येथे श्री नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याकडून करण्यात येते.या स्वागत सोहळ्याला जागा उपलब्ध करून द्यावी. पालखीसोहळ्या बरोबर येणाऱ्या दिंड्यांच्या ट्रकची उंची जास्त असल्याने रेल्वे रुळाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ओव्हर हेड करिअर मुळे वाहने शहरात येणार नाहीत. पंढरपूर शहरात अनेक दिंडी सोहळ्यांचे मठ असल्याने त्यांना आत ट्रक आणण्यास अडचणी निर्माण होतात या बाबत नियोजन करावे अशी मागणी राणा महाराज वासकर यांनी यावेळी केली.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading