महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय मंगळवेढा येथे आ समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न

महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते संपन्न

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ मे- संयुक्त महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिवसाच्या औचित्याने आयोजित मंगळवेढा तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

देशभरात सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहण्याची महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करत विकसित भारत २०४७ हा संकल्प प्रत्यक्ष साकारताना त्यात ‘विकसित महाराष्ट्र’ मोलाची भूमिका बजावत बजावेल, हा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढा देणाऱ्या असंख्य हुतात्म्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, सामाजिक ऐक्य आणि प्रगतीशील विचारसरणीचा अभिमान बाळगूया अशी भावना व्यक्त करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार हार्दिक शुभेच्छा आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केल्या.

यावेळी माजी पालकमंत्री प्रा.डॉ.लक्ष्मण ढोबळे,धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजी काळुंगे सर, प्रांताधिकारी बी.आर. माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, प्र.तहसीलदार श्री. जाधव,मुख्याधिकारी चरण कोल्हे, गटविकास अधिकारी योगेश कदम आदी मान्यवर तसेच शासकीय प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top