द.ह कवठेकर प्रशालेत गुणवंत सत्कार समारंभ संपन्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०७/२०२४ : मार्च 2024 मध्ये संपन्न झालेल्या दहावी शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ द.ह.कवठेकर प्रशालेत संपन्न झाला. यावेळी प्रशालेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या 51 विद्यार्थ्यांचा सत्कार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. यावेळी रचित अभिजित खुपसंगीकर प्रथम,तनिष्का नवनाथ माने द्वितीय,अनुष्का अविनाश मोहळे द्वितीय, मुग्धा श्रीनिवास कुलकर्णी तृतीय व पुढील गुणानुकर्मे 51 विद्यार्थी सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवठेकर,सचिव सु.र.पटवर्धन,पदाधिकारी एस.पी. कुलकर्णी, डॉ.मिलिंद जोशी,संजय कुलकर्णी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.अभिजित खुपसंगीकर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक आर.जी. केसकर सर गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी 51 गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून हलगी व ताशाच्या जल्लोषात त्यांची शालेय परिसरातून विजयी मिरवणूक काढली आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर व सचिव एस आर पटवर्धन सर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संस्थेचे सचिव एस आर पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले.यावेळी त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा व त्यात सर्वोच्च बना असा संदेश दिला.उपस्थितांचे आभार ज्येष्ठ शिक्षक आर एस कुलकर्णी सर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे निवेदन एस एम कुलकर्णी सर यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे पर्यवेक्षक एम आर मुंडे सर व क्रीडाशिक्षक जा.मु.शेलार सर,प्रशांत मोरे सर,संतोष पाटोळे सर आदींनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.