कुमारी सोनल प्रल्हाद मोदी यांची पंढरपूरला भेट

कुमारी सोनल प्रल्हाद मोदी यांची पंढरपूरला भेट
    पंढरपूर /नागेश आदापूरे - पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी narendra modi यांचे मोठे बंधू प्रल्हाद pralhad दामोदरदास मोदी यांची कन्या कुमारी सोनल प्रल्हाद मोदी व श्री संताजी जगनाडे महाराज पालखी प्रमुख अनिल राऊत यांनी आज आषाढी वारीच्या निमित्ताने नामदेव पायरी दर्शन घेतले . त्यानंतर त्यांनी आमदार परिचारक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परिचारक परिवाराच्यावतीने महेश परिचारक यांनी त्यांचे स्वागत केले. 

      वेदान्त भक्त निवासमध्ये तेली समाजाच्या वतीने त्यांचे पंढरपूर नगरीत स्वागत करण्यात आले.त्यावेळी महेश परिचारक ,तेली समाज नेते संदीप चिलेकर,माजी उपनगराध्य अनिल अभंगराव ,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, नगरसेवक सचिन शिंदे, तेली समाज मार्गदर्शक महेश विभुते,नागेश तुकाराम चिंचकर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: