News

एनएमएमएस परिक्षेत छ्त्रपती शिवाजी हायस्कूल चे यश

एनएमएमएस परिक्षेत छ्त्रपती शिवाजी हायस्कूल चे यश

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक अर्थात एनएमएमएस परिक्षेत पंढरपूर येथील छ्त्रपती शिवाजी हायस्कूलच्या इयत्ता आठवीतील मुलींनी घवघवीत यश संपादन केले.

कु.मेहर वैष्णवी किरण, कु.समृध्दी दाजी वाघमारे, कु.रिद्धी बाळासो मस्के यांनी हे यश मिळवले.

या यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव,संकुलाच्या प्राचार्या ॲड सौ.रजनीताई जाधव यांनी केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी प्राध्यापक शरद चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *