चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – संजय पापडीवाल

चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – संजय पापडीवाल Funds for Chandraprabhu Digambar Jain Temple renovation work will not be allowed to fall short – Sanjay Papadiwal

सोलापूर : कुमठे येथील अतिशय क्षेत्र श्री १००८ चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही त्यांना जेवढे लागेल तेवढा निधी आम्ही देण्यास तयार आहोत असे मत श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय पापडीवाल यांनी व्यक्त केले. ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना कुमठे येथील अतिशय क्षेत्र श्री १००८ चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिरास भेट देऊन पाहणी केली.

  यावेळी त्यांच्या समवेत प्रमोद कासलीवाल (राष्ट्रीय विश्वस्त), अनिल जमगे (महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष) ,भरत ठोले (महामंत्री), मनोज साहूजी (महाराष्ट्र उपाध्यक्ष), मिहीर गांधी (संस्थापक श्री सन्मती सेवा दल अकलूज),विनोद लोहाडे (राज्य कोषाध्यक्ष), केतन ठोले (मंत्री), डॉ.महावीर शास्त्री (महाराष्ट्र सदस्य), विरकुमार दोशी (अध्यक्ष रत्नत्रय शिक्षण सोसायटी सदाशिवनगर), रवींद्र कटके (महाराष्ट्र सदस्य), वीरेश पांढरे (सीए), महावीर शहा,श्रीपूर (माजी अध्यक्ष सेवा दल), सम्मेद शहा, नमन गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सकाळी 9:30 वाजता भगवंतास महाभिषेक करण्यात आला. 

   उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष शाम पाटील व महामंत्री वालचंद पाटील यांनी केला. आलेल्या सर्व सदस्यांनी मंदिराची पूर्ण पाहणी केली. जिर्णोद्धाराबद्दल त्यांनी काही सूचनाही दिल्या .

     यावेळी मिहीर गांधी,अनिल जमगे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंडित महावीर शास्त्री यांनी केले. स्वागत गीत अक्षदा शहा हिने केले. यावेळी नितीन कासार, संजय पानपट, चंद्रकांत कासार, आनंद पाटील, युवराज लोखंडे,पंडित अक्षय शहा,गणेश कासार , सचिन कासार,वैभव पाटील,दर्शन लोखंडे, ऋषिकेश कासार, महावीर पानपट, सचिन पाटील, महेश आहेरकर, विक्रांत बशेट्टी ,मनोहर कासार, बबन कासार, अजित पाटील, भागेश पाटील, अमोल पाटील, महेश पाटील, किरण पाटील, महेश पानपट आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: