बळीराजाचा माढा तहसील कार्यालयावर ऊस बिलसाठी हलगीनाद आंदोलन

बळीराजाचा माढा तहसील कार्यालयावर ऊस बिलसाठी हलगीनाद आंदोलन Halginad agitation for sugarcane bill at Madha tehsil office of Baliraja
माढा - माढा तालुक्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर लिमिटेड आलेगाव, विठ्ठल शुगर मॅन्युफॅक्चरिंग म्हैसगाव, बबनरावजी शिंदे साखर कारखाना केवड या कारखान्याने गेल्या गाळप हंगामामध्ये झालेल्या उसाचे थकीत बिले दिलेली नाहीत. शेतकऱ्यांचे एफ.आर.पी.प्रमाणे कायद्यानुसार चौदा दिवसात देणे बंधनकारक असताना आपल्या तालुक्यातील कारखानदारांनी एफआरपी कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. सदर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ कार्यकारी संचालकांनी शेतकऱ्यांचे ऊस बिले त्वरीत 15 टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी तसेच कारखान्यावर काम करत असलेल्या कामगारांचे पगारी त्वरित द्यावी तसेच ज्या कारखानदारांनी सदरचा कायदा मोडला आहे. त्या कारखानदारांवर चालू वर्षी गाळपासाठी ऊस परवाना देऊ नये असे पत्र आपल्या कार्यालयातून साखर आयुक्तालय, पुणे यांना तसा प्रस्ताव पाठवून सदर कारखान्याकडून होणारी पिळवणूक थांबवावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर यांच्यावतीने दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी हलगी नाद आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी यातून होणाऱ्या परिणामास प्रशासन व हे सर्व कारखानदार जबाबदार राहतील.

यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,जिल्हा उपाध्यक्ष रामदास दराडे,अमोल जगदाळे, विठ्ठल मस्के, तालुकाध्यक्ष रामेश्वर लोंढे, विजय खराडे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: