अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे क्रीडा स्पर्धांचे दिमाखदार उद्घाटन:सौ.क्रांती कुलकर्णी यांच्या हस्ते शुभारंभ
खेळातून निकोप आणि खिलाडी वृत्ती घडते:अध्यापक विद्यालयातील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर, सोलापूरच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता सौ.क्रांती कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.प्राचार्य डॉ.एच.आर. वाघमारे यांच्या उपस्थितीत खेळातून निकोप व खिलाडी वृत्ती जोपासण्याचे आवाहन करण्यात आले
Pandharpur news:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २१ जानेवारी २०२६ :अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे दि .२१ जानेवारी २०२६ रोजी क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर (सोलापूर) येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता सौ. क्रांती कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सौ. क्रांती कुलकर्णी तसेच अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर.वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना सौ.क्रांती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये निकोप सहभाग घेत शिस्त व खिलाडी वृत्ती जपण्याचे आवाहन केले.खेळांमुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक सक्षमतेचा विकास होतो,असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. एच.आर. वाघमारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा देत शिक्षणासोबत खेळालाही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान सौ. क्रांती कुलकर्णी यांनी स्पर्धेचा टॉस करून मुलींच्या पहिल्या खो-खो सामन्याला सुरुवात केली.
या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी संस्थेचे मानद सचिव सुधीर पटवर्धन सर तसेच संस्थेचे सदस्य एस.पी.कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण महाविद्यालय परिसरात क्रीडोत्सवाचा आनंद अनुभवायला मिळत आहे.

