या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे

या अपमानास्पद दाव्यावर मोदी सरकार आजपर्यंत गप्प का आहे ? – खासदार प्रणिती शिंदे modi gove praniti shinde

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०५/२०२५ – मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, राजनैतिकता आणि अंतर्गत स्थिरता यासारख्या गंभीर मुद्द्यांना पोकळ प्रचार आणि फोटो पोस्टिंगचे माध्यम बनवले आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे लक्ष फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची प्रशंसा करण्यावर राहिले आहे,परंतु देशातील लोकांना उत्तरे हवी आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशातील २६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले शूर सैनिक शहीद झाले.या सगळ्यानंतरही, देश अजूनही आपल्या २६ लोकांना मारणारे ते चार दहशतवादी कुठे आहेत हे जाणून घेण्याची वाट पाहत आहे. सरकार त्यांना अजून का अटक करू शकले नाही ?

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की त्यांनी व्यापारी दबाव आणून युद्धबंदी आणली. भारत सरकारला याबद्दल आधीच माहिती होती का ? या सर्व प्रश्नांची उत्तर मोदी सरकारकडून हवी आहेत असेही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Leave a Reply

Back To Top