मान्सूनपूर्व पाऊस: नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२५- नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दगडी पुलावर 35 ते 40 हजार क्युसेस ने पाणी वाहत असून भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडेला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भाविकांनाही खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे यासाठी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदे ची यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नगरपालिकेची अग्निशमन दल जवान बोट घेऊन दगडी पुलाजवळ व नदीपात्रात बोटी द्वारे गस्त घालत आहेत.

यावेळी पंढरपूर नगरपरिषद उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळुजकर,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे ,अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले,आरोग्य अधिकारी तोडकर , अग्निशमन दल यंत्रणा व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच लगतच्या असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत स्पीकरद्वारेही सूचना देण्यात आलेले आहेत.


