महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सोशाल मिडियात इंस्टाग्रामवर विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- रिपब्लिकन फायटर

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सोशाल मिडियात इंस्टाग्रामवर विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- रिपब्लिकन फायटर ची मागणी

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणारे अनेक व्हिडिओ,घोर अवमान करणारे फोटो आणि रिल सोशल मिडियात इंस्टाग्राम वर अपलोड करणाऱ्या राजपुताना समाज 20 K या अकाउंटवर तात्काळ कारवाई करून ते बंद करावे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सोशल मिडियात अवमान करणाऱ्या या समाजकंटकांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन फायटर संघटने तर्फे घाटकोपर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख यांना आज देण्यात आले.यावेळी संबंधित इंस्टाग्राम फेसबुक अकाऊंट तत्काळ बंद करून ते चालविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी रिपब्लिकन फायटर संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे रिपब्लिकन फायटर हेमंत रणपिसे, रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई उपाध्यक्ष सौ.नैनाताई वैराट,मुंबई उपाध्यक्ष सोहेल शेख,रिपब्लिकन फायटर सोशल मिडियाचे चे निमंत्रक आरिफ तांबोळी,मनोज रणपिसे,सुशांत बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशल मिडियात अवमान करणाऱ्या पोस्ट तात्काळ डिलिट कराव्यात. या अवमानकारक पोस्ट मुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावत आहेत.

सोशल मिडियात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांचा तीव्र निषेध रिपब्लिकन फायटर्स ने केला असल्याची माहिती रिपब्लिकन फायटर्स चे प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Back To Top