पंढरपूर शहरातील शरीरा विषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार

पंढरपूर शहरातील शरीराविषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार..

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्ह्या तील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविषयी गुन्हेगारी टोळी नं १ मधील सराईत गुन्हेगार १) शुभम किशोर लखेरी रा.विणे गल्ली,पंढरपुर ता.पंढरपुर (टोळी प्रमुख) २) दिनेश वासुदेव गोमासे, रा. कासारगल्ली, पंढरपुर (टोळी सदस्य ३) ईसा हारूण शेख रा.सहकार चौक,पंढरपुर ता. पंढरपुर (टोळी सदस्य ४) यश अनिल चव्हाण रा.ठाकरे चौक,पंढरपुर (टोळी सदस्य) तसेच टोळी नं २ यातील सराईत गुन्हेगार १) प्रविण उर्फ तात्या देविदास शिंदे रा.डोंबे गल्ली, पंढरपुर ता.पंढरपुर (टोळी प्रमुख) २) शहाजी देविदास शिंदे रा.डोंबे गल्ली,पंढरपुर (टोळी सदस्य ३) विशाल देविदास शिंदे रा. डोंबे गल्ली, पंढरपुर (टोळी सदस्य) यांचेविरूध्द पंढरपूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी वरील टोळीतील ०७ इसमांवर प्रस्ताव तयार करून हद्दपारीचे कारवाईबाबत अहवाल सादर केला होता.

पंढरपुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले पंढरपुर यांनी सदर हद्दपार करण्या संदर्भातील कामकाज चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेकडे सादर केला होता त्या अनुशंगाने टोळी नं ०१ यांना ०६ महिने तर टोळी नं ०२ यांना ०१ महिना कालावधी करीता संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले असून सदरची नोटीस ही हद्दपार इसमांना ताब्यात घेवून बजावण्यात आली आहे.

सदरची कामगीरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले पंढरपूर विभाग, पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि.आशिष कांबळे,स.पो.फौ. कल्याण ढवणे,पोलीस नाईक सचिन इंगळे, सिरमा गोडसे, शिवाजी पाटील,प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, विठ्ठल विभुते,शहाजी मंडले, कपिल माने,समाधान माने,बजरंग बिचुकले, निलेश कांबळे,धनाजी मुटकुळे,दिपक नवले, अनिस शेख तसेच सोलापूर ग्रामीण सायबर शाखेचे पो.कॉं.रतन जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top