काव्य प्रतिभा पुरस्कार प्रदान समारंभ पुण्यात होणार साजरा
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रख्यात कवी,लेखक व व्याख्याते डॉ. आशुतोष जावडेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार
पुणे/डॉ अंकिता शहा,दि.११ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते काव्य प्रतिभा पुरस्कार २०२५ प्रख्यात कवी,लेखक व व्याख्याते डॉ.आशुतोष जावडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार समारंभ संगत-संगत प्रतिष्ठान तर्फे रविवार १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, २ रा मजला, गांजवे चौक, नवी पेठ येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ.राजा दीक्षित असतील.डॉ.जावडेकर यांना पुरस्कार स्वरूपात सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. समारंभाचे सूत्रसंचालन निवेदिका शिल्पा देशपांडे करतील.याप्रसंगी कवयित्री प्राजक्ता वेदपाठक यांचे कविता वाचन होणार असून, निर्मितिमंथन कवीसंमेलन हेही या समारंभाचे खास आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मान्यवरांमध्ये बंडा जोशी, प्रमोद खराडे,माधव हुंडेकर, मृणालिनी कानिटकर, तनुजा चव्हाण, वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी,स्वप्निल पोरे,सुजित कदम, विजय सातपुते,डॉ.मृदुला कुलकर्णी खैरनार यांचा समावेश आहे.ऋचा कर्वे सूत्रसंचालन करणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन संगत-संगत प्रतिष्ठान चे अध्यक्ष ॲड.प्रमोद आडकर यांनी केले असून सर्व रसिक साहित्य प्रेमींनी या साहित्य समृद्ध सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.