सर्वच बालगृहांमध्ये मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यास नव्याने कार्यप्रणाली निश्चित करा-उपसभापती डॉ.गो-हे

छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहातील घटनेच्या अनुषंगाने डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सर्वच बालगृहांमध्ये मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी नव्याने कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबत विभागास उपसभापती डॉ.गो-हे यांच्या सूचना

मुंबई,दि.१४ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय, आमदार श्रीमती चित्रा वाघ,आमदार श्रीमती प्रज्ञा सातव, महिला व बालविकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे ,सहआयुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

संस्थांच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित करणे, तपासणी साठी भरारी पथके नियुक्त करणे व बालगृहातील मुलींचा त्यांच्या पार्श्वभूमी व आवडीनुसार बालगृहात सामावून घेणेबाबत विचार करणेबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत संबंधित विभागाला सूचना दिल्या. राज्यातील बालगृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित सुधारणा करणे, देखरेख यंत्रणा अधिक बळकट करणे, बालकांचे हक्क संरक्षित राहावेत यासाठी स्वतंत्र निरीक्षण समित्या स्थापन करणे तसेच बालगृह व्यवस्थापनात पारदर्शकता वाढवण्या बाबत उपाययोजना करण्यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण चर्चेच्या अनुषंगाने लवकरच ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील,असे मंत्री महोदयांनी आश्वस्त केले.

Leave a Reply

Back To Top