मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना

मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना

मडगाव,गोवा/ ज्ञानप्रवाह न्यूज – मडगाव गोवा येथे श्री 108 आदिनाथ दिगंबर जैन नवनिर्माण ट्रस्टच्या वतीने परमपूज्य आचार्य शांतीसागर आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव अंतर्गत शांतीसागर गुरु मंदिराचे स्थापना मडगाव येथे प.पू. क्षुल्लकरत्न समर्पण सागर महाराजांच्या सानिध्यात व प्रतिष्ठाचार्य डॉ. सम्मेद उपाध्ये यांचे उत्कृष्ट संस्काराने संपन्न झाले.

यानिमित्त मंदिरात शांतिसागर विधान,गुरु चरण स्थापना, पंचामृत अभिषेक,भगवान चंद्रप्रभू मोक्ष कल्याणीक,गुरु मंदिर शुद्धीकरण, संस्कार प्रतिमा, प्रतिष्ठापना सानंद संपन्न झाला.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत, प्रा.डी.ए. पाटील(राष्ट्रीय महामंत्री),डॉ. कल्याण गंगवाल, देवेंद्र बागल (जीएसटी) गोवा आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भारत भाई दोशी यांनी संयोजन केले.फलटण,बारामती,नातेपुते, सांगली,कोल्हापूर,बेळगाव व गोवा परिसरातील जैन बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. श्री.शेंदुरे परिवार, साखळी यांनी मंदिर निर्माण व स्व.संजय जी जव्हेरी यांनी 550 किलो तांब्याची शांतीसागर मूर्ती देऊन अनमोल सहकार्य दिले आहे.

प्रा.डी.ए.पाटील यांनी सहयोगी संस्था कार्यकर्ते श्रावक श्राविकांचे आभार मानून 2 दिवसाचा महोत्सव संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *