एक उपक्रम – विद्यार्थ्यांची पावले चिखलात… आणि मन समाजासाठी झुकलेले

विद्यार्थ्यांची पावले चिखलात… आणि मन समाजासाठी झुकलेले

भोर /ज्ञानप्रवाह न्यूज- भोर तालुक्यातील चिखलावडे गावामध्ये शेतकऱ्यांच्या भातलावणीसाठी एक वेगळीच प्रेरणा समोर आली.सायबेज फाउंडेशन अंतर्गत सायबेज आशा स्वयंसेवक आणि खुशबू स्कॉलरशिप चे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरत चिखलात उभं राहत शेतकऱ्यांना एक मोलाचा हातभार लावला.

पुस्तकं वाचणारे हात आज चिखलात मातीशी बोलत होते, डेस्कवर बसणारे पाय पाणथळ पावलवाटांवर होते मात्र ही मदत केवळ एक दिवसासाठी नव्हती तर ती होती समाजाशी असलेल्या आपुलकीची, शेतकऱ्यांप्रती असलेल्या कृतज्ञतेची आणि श्रमसंस्कारांची जिवंत अनुभूती.

शेती म्हणजे आपल्या देशाची खरी अर्थ व्यवस्था,शेतकरी म्हणजे देशाचा खरा पोशिंदा आणि त्याच शेतकऱ्याच्या मदतीला जेव्हा शिकणारे विद्यार्थी स्वतःहून पुढे येतात,
तेव्हा शिक्षणाचा खरा उपयोग कसा असावा, याचं उदाहरण उभं राहतं.

या उपक्रमात विद्यार्थी केवळ शेतकाम शिकले नाहीत तर श्रमाचं महत्व,सहकार्याची ताकद आणि माणुसकीचा खरा अर्थ सुद्धा.यासाठी सायबेज आशा फक्त CSR उपक्रम नाही,ती आहे ग्रामीण भारतासाठी एक जिवंत आशा,जी शिक्षण,सेवा आणि संधी यांना एकत्र जोडते.

Leave a Reply

Back To Top