मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका करताहेत : खासदार प्रणिती शिंदे

मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका करताहेत : खासदार प्रणिती शिंदे

आत्ता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे.दिवस मोजायला सुरुवात करावेत.

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या मतचोरीचा बुरखा फाडला.त्यावर आम्ही अजून सखोल अभ्यास आणि संशोधन करणार आहोत.आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे दिवस मोजायला सुरुवात करावेत.यामुळे भाजप बचावाच्या भूमिकेत गेला आहे आणि मतचोरीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दाही नाही.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मुलाखतीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जे वक्तव्य केले, त्यावर त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्यामुळे ते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत.निवडणूक आयोग आणि सरकार हे हातात हात घालून काम करत आहेत हे सिद्ध झाले आहे.

कालच्या पत्रकार परिषदेनं जनतेवर प्रचंड परिणाम झाला असून आता भाजपच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे.

Leave a Reply

Back To Top