रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य पंढरपूर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस राखी बांधण्यात आली
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- शनिवार दि. ०९/०८/२०२५ रोजी रक्षाबंधन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.

त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट,नाम, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, दंडपेट्टया जोड, हि-याचा कंगन जोड,मोत्याची कंठी, मोत्याचा हार,बाजीराव कंठी,मत्स्य जोड, तुळशीची माळ,सहा पदरी जान्हवे, लहान- मोठा शिरपेच,राखी तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट,वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी,जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.

यावेळी संभाजी शिंदे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य पंढरपूर तथा शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस राखी बांधण्यात आली.
त्याप्रसंगी बोलताना संभाजी शिंदे यांनी माझ्याकडून श्री विठ्ठल भक्तांची सेवा सदैव अशीच घडत रहावी अशी मागणी श्री विठ्ठल व माता रूक्मिणी यांचे चरणी केली असे सांगून आज माझ्या जिवनाचे सार्थक झाले असे ते म्हणाले.यावेळी भाळवणी गावचे मा.सरपंच धोंडीराम शिंदे व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
