राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महायुती सोबत विरोधी पक्षांनीही मतदान करावे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.20- महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीसोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार ना.रामदास आठवले यांनी मानले आहेत.

आठवलेंनी जय महाराष्ट्र म्हणत केले प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन

आज उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज आज सी पी राधाकृष्णन यांनी एन डी ए चे उमेदवार म्हणून दाखल केला. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते आणि एन डी ए चे घटक पक्षांचे नेते म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. सी पी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज भरून बाहेर येताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ना.रामदास आठवले यांनी हस्तांदोलन करून महाराष्ट्राच्या राज्यपालांची उपराष्ट्रपती पदासाठी एन डी ए चे उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल आठवलेंनी जय महाराष्ट्र म्हणत प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले .

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्रात आणि तमिळनाडूत तसेच देशभर चांगले काम केले आहे. त्यांना अनेक विषयांचा चांगला अभ्यास आणि अनेक प्रश्नांची जाण आहे. दलित वंचित आदिवासी बहुजन वर्गासाठी त्यांनी चांगले काम केले आहे.प्रगल्भ सामाजिक जाणिवेचे ते नेते आहेत.त्यांच्याशी माझे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण चांगले संबंध आहेत. एन डी ए तर्फे उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्याबद्दल सी पी राधाकृष्णन यांचे आपण अभिनंदन केले असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपती पदासाठी निवडले जाणे हे आपल्यासाठी अभिमानाचे असल्याने पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांना मतदान करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top