आंदोलन हाताळताना तीन पक्षात असलेला समन्वया बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर म्हणणे मांडले


मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०९/२०२५- इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाच्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात सहभागी होऊन राज्यातील विविध विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली.


मराठा आरक्षण आंदोलन,शासनाने काढलेल्या जीआरची वैधता,आंदोलना दरम्यान मुंबईत उद्भवलेली परिस्थिती, आंदोलन हाताळताना तीन पक्षात असलेला समन्वय याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर म्हणणे मांडले.

तसेच मुंबईमध्ये सुरू असलेले विविध विकासप्रकल्प,कोस्टल रोड,एस्कप्रेस हायवे वरील मिसिंग लिंक,एमएमआर रिजन मधील मेट्रोचे जाळे,मुंबईतील काँक्रीटचे रस्ते याबाबतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे म्हणणे विस्ताराने मांडले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढू आणि विजयी होऊ असेही याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

यावेळी शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी,इंडियन एक्सप्रेस वृत्त समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका, इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक पी.वैद्यनाथन, निवासी संपादक संदीप सिंह, ज्येष्ठ राजकीय पत्रकार शुभांगी खापरे, पत्रकार आलोक देशपांडे, पत्रकार वल्लभ ओझरकर आणि संपादकीय विभागातील सर्व प्रमुख पत्रकार उपस्थित होते.

