छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१२/०९/ २०२५ – आज तावशी,शेटफळ, तनाळी,सिद्धेवाडी,एकलासपूर,शिरगाव, चिचुंबे या गावामधील नागरिकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मौजे तावशी येथे तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे,उपविभागीय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर विभाग पंढरपूर हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सचिन लंगोटे होते.

या कार्यक्रमास श्री मोरे तालुका कृषी अधिकारी,डॉ.एकनाथ बोधले तालुका आरोग्य अधिकारी,विकास काळोखे सहाय्यक गट विकास अधिकारी दादा गावंदरे,सहा.महसूल अधिकारी, जे.एम.कुंभार सहा.महसूल अधिकारी आनंद सोनवणे,ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी खर्डी व कासेगाव तसेच या मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक ,पोलीस पाटील,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर इत्यादी ग्रामस्तरावरील सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी खालील प्रमाणे लाभ वाटप करण्यात आले.
- जातीचा दाखला प्रमाणपत्र -103
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 87
- रहिवासी प्रमाणपत्र – 96
- उत्पन्नाचा दाखला – 167
- रेशन कार्ड -27
- संजय गांधी व श्रावण बाळ मंजूर लाभार्थी- 3
- आरोग्य विभाग-276 (आयुष्यमान भारत कार्ड-10, उच्च रक्तदाब तपासणी- 46, शुगर तपासणी-35, हिमोग्लोबिन तपासणी-31,डोळे तपासणी-60, प्रथमिक औषधोपचार-94)
- कृषि विभाग 12 (ठिबक सिंचन-1, फळबाग-3,शेत तळे – 1,ट्रॅक्टर -1, रोटा वेटर-1, अस्तरीकरण-1, पावर टिलर -1)
- गणवेश वाटप – 10
- ग्रामपंचायतकडील लाभ – 9
असे एकूण 790 लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे.