प.कुरोली जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्टीलच्या डब्यांचे वाटप

प.कुरोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या(चिंचकर वस्ती) येथील विद्यार्थ्यांना स्टीलचे डब्याचे वाटप

राहुल सर्जे यांचा संचालक लक्ष्मण धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली येथे स्तुत्य उपक्रम

प.कुरोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे राज्य परिषद सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सोलापूर जिल्हा भाजपा ओबीसी सेल चे लक्ष्मण धनवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली येथील चिंचकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ ५० स्टीलच्या डब्यांचे वाटप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरून जेवण बनवून आणण्यासाठी जी गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी लक्ष्मण धनवडे यांचे समर्थक राहुल सर्जे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला.

या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी धनाजी बोबडे गुरुजी,मारुती कोळसे, रमेश नाईकनवरे, भगवान नाईकनवरे,प्रशांत मलशेट्टी,अंकुश जवळेकर,प्रसाद नाईकनवरे,निलेश गवळी, संतोष कोळसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top