पंढरपुर शहरातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची कारवाई ५,३३,४६०/- रू चा मुद्देमाल केला जप्त
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२७/०९/२०२५ रोजी पंढरपुर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनिय बातमी मिळाली की पंढरपूर शहरातील जुनी पेठ भागातील साठे नगर येथे नागेश यादव हा स्वतःच्या घरामध्ये अवैध जुगाराचा अड्डा चालवित आहे.या खात्रीशीर बातमीआधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना सदरची कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई राजेश गोसावी, पोहेका शिरमा गोडसे,पोहेकॉ विठ्ठल विभुते, पोहेकॉ प्रसाद औटी,पोहेकॉ सचिन हेंबाडे, पोना ५४६ पकाले, पोकॉ शहाजी मंडले, पोका कपिल माने, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले यांचेसह रवाना होवुन सदर ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली.

नागेश प्रकाश यादव याचे राहते घराचे वरती एका खोलीमध्ये अवैध जुगार खेळत असल्याने सदर अड्ड्यावर छापा टाकला असता सदर ठिकाणी ८ इसम ५२ पत्याचा तिरट नावाचा जुगार पैशाची पैज लावुन खेळत असताना दिसले. त्यांना जागीच पकडुन पोलीस ठाणेस आणून त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.सदर आरोपींकडे एकुण ०२ दुचाकी, ०१ चार चाकी असे ०३ वाहने, ०५ मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५,३३,४६०/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६२८/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधि. कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कारवाई केलेल्या इसमांची नावे १) नागेश प्रकाश यादव वय. २५ वर्षे, रा साठे नगर पंढरपुर २) सुरज प्रकाश यादव वय. ३५ वर्षे, रा. साठे नगर पंढरपुर, ३) साहिल रशीद तांबोळी वय. २३ वर्षे रा. आंबेडकर नगर पंढरपुर, ४) दिपक उत्तम यादव वय. ४१ वर्षे, रा. शेगाव दुमाला ता. पंढरपुर, ५) अनिल साधु डिसले वय. ५४ वर्षे, रा. अनवली ता. पंढरपुर, ६) गोदुराम दत्तु खिलारे वय. ३५ वर्षे, रा. व्यासनारायण झोपडपटटी पंढरपुर, ७) भोला शेखर अभंगराव वय.२२ वर्षे, रा. जुनी पेठ कोळी गल्ली पंढरपुर, ८) नारायण एकनाथ वाघ वय. ३८ वर्षे, रा. गोविंदपुरा ता. पंढरपुर
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा अतिरीक्त कार्यभार पंढरपुर उपविभाग पंढरपुर,पंढरपूर शहर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक आशिष कांबळे,पोसई राजेश गोसावी,पोह सिरमा गोडसे,पोह विठ्ठल विभुते,पोह २२१ प्रसाद औटी,पोह सचिन हेंबाडे,पोना सचिन इंगळे,पोकों कपिल माने,पोशि शहाजी मंडले,पोकॉ बजरंग बिचुकले,पोकॉ दिपक नवले तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी केली.