श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन उत्साहात संपन्न
श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –ता.५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर व ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग – सामूहिक चिंतन महाप्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन हा कार्यक्रम ४ व ५ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

या संमेलनाचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जयकुमार कमल गोरे सोलापूर जिल्हा यांच्या हस्ते झाले.या वेळी श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी स्वागतपर भाषण केले.
आचार्य डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी भूमिका मांडली आणि ह.भ.प.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी बीजभाषण केले.

ज्ञानेश्वरीतील श्री निवृत्ती-ज्ञानदेव संवाद या सत्रात ह.भ.प.श्री.भागवत महाराज साळुंके यांनी रसपूर्ण विवेचन केले.
श्रीमद् भगवत ज्ञानेश्वरीतील पात्रांचा तौलनिक विचार या विषयावर ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे भाषण प्रभावी ठरले.
अमृतानुभव विषयावर ह.भ.प.श्री.जयवंत महाराज बोधले यांनी मनोवेधक विवेचन केले.
श्री ज्ञानदेव,ज्ञानदेवी आणि भाषा व्यवहार या विषयावर अभय टिळक यांनी आपले विचार व्यक्त केले.संतपूजनाचा कार्यक्रम डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे व डॉ.दिलीप धनेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप संतपूजन, सामूहिक पसायदान व आभार प्रदर्शनाने झाला.संमेलन समन्वयक ह.भ.प.श्री.उमेश बागडे यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,सदस्य शकुंतला नडगिरे,संभाजी शिंदे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ,ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,प्र.व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच अनेक मान्यवर वारकरी व भाविक यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रम पार पडला.कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सर्वांचे आभार मानले. या राज्यस्तरीय संमेलनात विविध विद्यापीठांतील अभ्यासक,संत साहित्यप्रेमी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री ज्ञानदेवांच्या विचारधारेचा अभ्यास, चिंतन व प्रसार साध्य करण्याच्या दिशेने हे संमेलन एक प्रेरणादायी पाऊल ठरले.