द.ह.कवठेकर प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड


पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेच्या कु.संस्कृती दिपक परचंडे व कृष्णा दिपक परचंडे या भाऊ बहिण यांनी उत्कृष्ट यश मिळवत दोघांनीही प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे दोघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


त्या दोघांचेही द ह कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी,पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे संचालक एस.पी.कुलकर्णी सर,संजय कुलकर्णी सर तसेच उपमुख्याध्यापक एम.आर.मुंढे, पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पी.एस.मोरे,एस.व्ही.पाटोळे सर, एम.बी.कुलकर्णी सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.


