पीसीबीचा धडाकेबाज निर्णय-रिझवान बाद आणि शाहिन कर्णधारपदी
माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे नेतृत्वाची सूत्रे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघात मोठा बदल करत मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच्या जागी माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली आहेत.
इस्लामाबाद येथे पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.वनडे आणि टी-20 कोच माईक हेसन यांच्याही सल्ल्यानुसार ही निवड करण्यात आली. आयसीसीने सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रक जारी करत या निर्णयाची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली.

शाहिनवर पुन्हा विश्वास — पण यावेळी वनडे नेतृत्वाची जबाबदारी
याआधी शाहिनने पाकिस्तानच्या टी-20 संघाचे नेतृत्व केले होते, मात्र त्या मालिकेत पाकिस्तानला 1-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.त्यामुळे आता शाहिन एकदिवसीय संघाला कितपत यश मिळवून देईल याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
रिझवानची हकालपट्टी की रणनीतीत बदल?
या निर्णयामागे पीसीबीचे आगामी आयसीसी स्पर्धांकडे लक्ष असल्याची चर्चा सुरू आहे. नव्या नेतृत्वाखाली संघाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शाहिनआफ्रिदी,पाकिस्तानक्रिकेट, रिझवानआऊट, पीसीबीअपडेट, CricketNews,CaptainChange, ShaheenAfridiCaptain,PakCricket,trending, Trend, dnyanPravahNews, ज्ञानप्रवाह न्यूज,