माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाज आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा केला जाहीर

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा केला जाहीर

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२४– हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गात सामावून घ्यावे आणि त्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी बंजारा समाजाचे पीयूष पवार आणि अशोक चव्हाण यांनी नेहरू नगर सोलापूर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता. या आंदोलनस्थळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला.

शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले की, बंजारा समाजाचा हक्काचा प्रश्न आहे. समाजाला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस करून त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली तसेच शासनाने तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.

यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुभाष चव्हाण, अलकाताई राठोड, पांडुरंग पवार, शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, भोजराज पवार, नामदेव राठोड, प्रेमसिंग राठोड, किरण चव्हाण, सचिन चव्हाण, उमाकांत राठोड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top